सोनम वांगचूक यांचे उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
सोनम वांगचूक यांचे उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. याच ठिकाणी अभिजीत दीपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय, संसदेवरील मोर्चा काढणा-या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला.
हा प्रकार हुकूमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी, महिलाध्यक्ष, नगरसेविका मनिषाताई भगत, युवक अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजित पवार, नगरसेविका पल्लवी जगताप, मुंब्रा – कळवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजेश साटम, फुलबानो पटेल, मिलींद बनकर, महेश भाग्यवान, समीर पाटील, एकनाथ जाधव, अविनाश अंधारे, साहिल उदगुडे, अंकुश मढवी, मनिषा पाटील, शशिकला पुजारी, माधुरी सोनार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


