नेरळ रेल्वे स्थानकात ‘जीवन रक्षा अभियान’

‘लाईन क्रॉस ‘विरोधात जनजागृती

रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्जत रेल्वे पोलिसांच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात ‘जीवन रक्षा अभियान’ अंतर्गत ‘लाईन क्रॉस’ जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे किती धोकादायक ठरू शकते, याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे सुरक्षेचे नियम पाळणे, पादचारी पुलाचा वापर करणे तसेच धावत्या रेल्वेत चढ-उतार न करणे याबाबतही प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले.

या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला. किरण मतकर, लोखंडे व कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र बागुल, मेघा पाटील, अजय शिर्के, महेश शिरसागर तसेच होमगार्ड मनीष खुणे, कैलास तरे, राजेश भट, वेंकी धनवटे, केतन चंचे यांच्यासह पोलीस व होमगार्ड स्टाफ उपस्थित होता. दरम्यान, ‘स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रेल्वे रूळ कधीही ओलांडू नका आणि रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा नियमांचे पालन करा,’ असे आवाहन कर्जत रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना करण्यात आले.

Scroll to Top