तीन पुरस्कारांनी ‘शिंदेंच्या नेतृत्वा’वर आंतरराष्ट्रीय मोहोर; मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष!

तीन पुरस्कारांनी 'शिंदेंच्या नेतृत्वा'वर आंतरराष्ट्रीय मोहोर; मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष!

आंतरराष्ट्रीय सन्मान घेऊन परतलेल्या उपमुख्यमंत्र्यांचे विमानतळावर जंगी स्वागत; लंडन दौऱ्याच्या यशाचे कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन

लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविले गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतताच शिवसैनिकांनी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा गौरव आणि मुंबईत कार्यकर्त्यांकडून झालेला जल्लोष, या दोन्ही घटनांनी शिंदे यांच्या नेतृत्वाभोवतीचा राजकीय उत्साह अधोरेखित केला.
तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यात मिळालेले हे पुरस्कार केवळ वैयक्तिक गौरव नसून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लंडनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी समाजाने केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने आपण भारावून गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. समुद्रापलीकडे राहूनही मराठी माणूस आपली भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेले नाते जपतो, याचा अनुभव या दौऱ्यात आल्याचे त्यांनी नमूद
केले.
लंडनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका आणि राज्यातील विकासाची क्षमता जगासमोर मांडता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनमधील पायाभूत सुविधा, रस्ते,
वाहतूक शिस्त आणि हेरिटेज वास्तूंचा अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो, असेही ते म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याची संधी मिळाल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या सन्मानाचा उल्लेख करताना शिंदे यांनी परदेशातील मराठी समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली. पारंपरिक मराठी वेशभूषेत झालेले स्वागत आणि मराठी भाषेचा झालेला जागर हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांची भेट झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी करूनही त्यांचा साधेपणा आणि नम्रता भावल्याचे त्यांनी नमूद केले.
लंडनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका आणि राज्यातील विकासाची क्षमता जगासमोर मांडता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनमधील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक शिस्त आणि हेरिटेज वास्तूंचा अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो, असेही ते म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याची संधी मिळाल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

Scroll to Top