महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली असताना भविष्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होणार असल्याने भिवंडी पालिका प्रशासनाने पाणीचोरी तत्काळ बंद करून, शहरातील ७० अनधिकृत बॉटलिंग प्रकल्पांवर कारवाई करण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
पालिका क्षेत्रात ७० अनधिकृत बॉटलिंग प्रोजेक्ट असून त्यामधून लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. तर सायझिंग डाईंग व सर्विस सेंटर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पाणी उपसा सुरू आहे. याव्यतिरिक्त शहरात अनधिकृत नळ जोडण्याच्या माध्यमातून पाणी चोरी सर्रासपणे सुरू असल्याने भविष्यात शहरातील सर्वसामान्य जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ अनधिकृत बॉटलिंग प्रकल्प, शहरात होणारी पाणी चोरी व गळती तत्काळ थांबवून पाणी वितरणाचे नियोजन करण्याची गरज असून एक महिन्यात यावर प्रशासनाने नियंत्रण आणून कारवाई न केल्यास उग्र निदर्शने करण्याचा इशारा शेवटी आमदार रईस शेख यांनी दिला आहे.
पालिकेने पाणी चोरी तत्काळ बंद करून वितरण नियोजन करावे – आमदार रईस शेख



