शहापूर – शहापूर तालुक्यातील एस. एल. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील लकडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. लकडे यांना पुढील वाटचालीसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी शुभेच्छा दिल्या.
शहापूर येथे वैश्य वाणी हॉल मध्ये झालेल्या सुनिल लकडे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी आमदार पांडुरंग बरोरा, अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्करशेठ जाधव , शहापूर पूर्व मंडल अध्यक्ष सुभाष हरड सर, दक्षिण मंडळ अध्यक्ष दिपक बोंबे, शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, पी. के. म्हात्रे, तुकाराम भाकरे, आठगाव सरपंच भास्कर बरोरा,गजानन गोरे, राम जागरे सर, जगन विशे, प्रमोद बसवंत, विलास गगे, मनोज पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनिल लकडे समर्थक कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


