अंबरनाथ शहरा लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील चिखलोली, मोरीवली, वडोळ गाव तसेच जांभिवली पाडा या भागात अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, यामुळे येथील रस्ते खड्डेमय झालेले असून अपघात टाळणेकरिता तसेच वाहतूक, रहदारी सुरळीत होणेकरीता याभागातील रस्ते काँक्रिट्युक्त करण्याबाबत केलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, याकरीता उद्योगमंत्री- कार्यालय यांना पत्राद्वारे शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मागणी केली होती. या मागणी प्रस्तावाला उद्योग मंत्री उदय सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहत क्षेत्रात (विकसित व अविकसित) मोठ्या प्रमाणात देशी झाडांची लागवड करावी, संवर्धन करावे, छोट्या-मोठ्या कंपन्या व रस्ते करताना झाडांची कत्तल केली जाते, त्याप्रमाणात वृक्षारोपण केले जात नाही. यामुळे वातावरणात तापमान वाढ होत असून दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढल्या आहेत, आज तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस वाढल्याने उष्माघातने अनेक नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे सावली व थंड हवामान राहण्यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेऊन देशी झाडांची लागवड करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, याकरीता अनुभवी सामाजिक संस्था, आस्थापना, कंपन्या, ठेकेदार यांना जबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून Man Made Forest हि संकल्पना प्रत्यक्ष कृतीत येईल.
तसेच नवीन एमआयडीसी क्षेत्र घोषित करताना जाणीव पूर्वक १ ते २ एकर जागा ( plot) फक्त गडद हिरवेगार जंगल निर्मिती करिता राखीव ठेवण्यात यावा. अश्या महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना डोंबिवली येथे देण्यात आले.
अशा प्रकारे सामाजिक व पर्यावरणपुरक महत्वाचा विषय घेतल्याबद्दल सुभाष साळुंके यांचे यावेळी कौतुक केले, उद्या कश्याला येता, आजच निवेदन द्या, त्वरित निर्देश देतो असे सांगून हाती घेऊन सुभाष साळुंके यांच्याकडून दोन्ही निवेदन पत्र घेतले, त्यावर उभ्या उभ्या गाडीच्या काचेवर पत्र ठेवून सकारात्मक शेरा मारला व CEO Midc सीईओ- एमआयडीसी यांना त्वरेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांच्या कामाचा व कार्याचा वसा मंत्री सामंत यांनी कृतीत घेतल्याचे यावेळी दिसले. त्यांच्या या कार्यतत्पर वृतीने उपस्थित भारावून गेले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम उपस्थित होते.


