दिव्यात पाणी माफियांवर महापालिकेची धडक कारवाई; ६१ पंप जप्त

दिव्यात पाणी माफियांवर महापालिकेची धडक कारवाई; ६१ पंप जप्त

नगरसेवक ऍड आदेश भगत यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

दिवा गाव आणि दिवा पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणा-या ठाणे महानगरपालिकेच्या ३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडण्यांवर अखेर महापालिकेच्या पाणी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत पाणी खेचण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ६१ वॉटर पंप मशीन जप्त करण्यात आले. तसेच बेकायदा जोडण्या खंडित करण्यात आल्या. दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची तक्रार नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिवा प्रभाग समितीच्या पाणी विभागाकडे केली होती. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पाणी चोरी होत असलेल्या विविध ठिकाणांचा उल्लेख करून संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाणी विभागाने बुधवारी कारवाई केली.
दिवा पूर्वेतील साबेगाव रोडवरील सिद्धार्थ पार्कजवळील साईबाबा मंदिराच्या मागील बाजूस तसेच रेशनिंग कार्यालयाजवळ पाणी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन करून पाणी चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले.

Scroll to Top