एसईपीसीया एमडींकडून बर्नपूरमध्ये सेल-आयआयएससीओ स्टील प्लांटसोबत ₹८५४.५७ कोटींचा करार

सेल-आयआयएससीओ स्टील प्लांटसोबत ₹८५४.५७ कोटींचा करार

चेन्नई: एसईपीसी लिमिटेड औद्योगिक पायाभूत सुविधा, प्रक्रिया
प्रकल्प तसेच पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या आघाडीच्या ईपीसी कंपनी एसईपीसी लिमिटेडने, पश्चिम बंगालमधील बर्नपूर येथील सेल-आयआयएससीओ स्टील प्लांट (आयएसपी) येथे पेलेट प्लांट बीओपीसह नागरी व संरचनात्मक कामांसाठी (पेलेट प्लांट पॅकेज-२) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) सोबत करार केला आहे. ₹८५४.५७ कोटी मूल्याच्या या प्रकल्पाचा करार ८ ऑक्टोबर २०२६ रोजी औपचारिकरीत्या करण्यात आला. ऑगस्ट २०२६ मध्ये कंपनीला सेल-आयआयएससीओकडून या प्रकल्पासाठी स्वीकृतीपत्र (लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स) प्राप्त झाले होते. करारावर बर्न पूर येथील सेल-आयआयएससीओ स्टील प्लांटमध्ये सेल-आयआयएससीओच्या वतीने प्रवीण कुमार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) आणि एसईपीसी लिमिटेडच्या वतीने श्री. वेंकटरमणी जयगणेश, व्यवस्थापकीय संचालक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सुरजित मिश्रा, प्रभारी संचालक, दुर्गापूर स्टील प्लांट आणि आयआयएससीओ स्टील प्लांट, बर्तपूर, श्री. व्ही. के. सिंह, कार्यकारी संचालक (वर्क्स), श्री. जितेंद्र कुमार, कार्यकारी संचालक (पर्सनल), श्री. अरविंद चंद्र गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (प्रकल्प) तसेच सेल-आयआयएससीओचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
४.०८ हा प्रकल्प बर्नपूर येथील सेल आयआयएससीओच्या एमटीपीए कूड स्टील एक्सपैंशन प्रकल्पाचा एक भाग असून, त्याची अंमलबजावणी विभाज्य टर्नकी तत्त्वावर केली जाणार आहे. कराराचे एकूण मूल्य १९५१.६० कोटी असून, त्यापैकी १९७.०४ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट सेलला हस्तांतरित केले जाणार आहे. त्यामुळे कराराचे निव्वळ मूल्य १८५४.५७ कोटी आहे. कराराच्या ३ सप्टेंबर २०२६ या प्रभावी तारखेपासून ३२ महिन्यांच्या आत या सुविधांचे कार्यान्वयन पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एम. एन. दस्तुर अँड कंपनी प्रा. लि. ही अभियांत्रिकी व बांधकाम व्यवस्थापन सल्लागार कंपनी, तर मेकॉन लिमिटेड ही खरेदी व करार अभियांत्रिकी सेवा सल्लागार कंपनी आहे.
एसईपीसीची एकत्रित ऑर्डर बुक ₹१०,००० कोटींच्या पुढे गेली आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ मधील ₹१,०८५.८ कोटींच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत ही ऑर्डर बुक नऊ पटींहून अधिक आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे कंपनीच्या आगामी अनेक वर्षातील महसुलाबाबत स्पष्टता वाढली असून, मोठ्या औद्योगिक ईपीसी प्रकल्पांमधील एसईपीसीची वाढती उपस्थिती अधिक दृढ झाली आहे.

Scroll to Top