वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्या विरोधात शंभूदुर्ग संघटनेचा मोर्चा

खडवली परिसरात वारंवार होत असलेल्या वीज खंडित प्रकाराच्या निषेधार्थ शंभूदुर्ग संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालय, खडवली शाखा येथे शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आघाडी, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, रिक्षा युनियन, मेडिकल क्षेत्र यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

महावितरण खडवली शाखेचे शाखा अधिकारी योगेश चेंदवणकर यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून संघटनेतर्फे मांडण्यात आलेल्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. हा मोर्चा शंभूदुर्ग संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर मोरे व हाराष्ट्र राज्य संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी तालुका अध्यक्ष जयवंती लोणे, उपजिल्हाध्यक्ष वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी शंभूदुर्ग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष व सरपंच चेतन शेलार, सदा मोरे, जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग संदेश लोणे, तालुका सचिव रुपेश खंडागळे, देवा सोनावले, अक्षय ठिंगळे, वैभव मोरे (रिक्षा युनियन अध्यक्ष), एकनाथ मोरे (व्यापारी संघटना अध्यक्ष), किरण मोरे, उपाध्यक्ष कुणाल दलाल, तसेच मेडिकल असोसिएशन अध्यक्ष राजेश मोरे, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारंवार होणारे वीज खंडित प्रकार बंद करणे, अखंड व सुरळीत वीज पुरवठा, जुनी – वीज यंत्रणा व वायर बदलणे, ओव्हरलोड लाईनची दुरुस्ती, आप्तकालीन टीम तयार – करणे, कार्यक्रम काळात अखंड वीज पुरवठा, कामांचे वेळापत्रक जाहीर करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. विशेष म्हणजे शंभूदुर्ग संघटना महिला आघाडीने हा मोर्चा यशस्वी व पूर्णत्वास नेण्यासाठी मोठे योगदान – दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top