बापगाव येथील क्रीडांगण, गोशाळा व आदिवासी समाजाच्या वस्त्यांचे संरक्षण करा

स्थानिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कल्याण भिवंडी सीमेलगत असलेल्या बापगाव, देवरुंग व देवरुंगपाडा परिसरातील २२ एकर जागेवर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकल्प प्रस्तावित असल्याने या प्रकल्पामुळे बापगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, राम कृष्ण हरी गोशाळा व स्थानिक ग्रामस्थ व आदिवासी समाजांच्या वस्त्या बाधित होणार आहेत. त्यामुळे येथील नागरिकांवर देखील बेघर होण्याची वेळ येणार असून युवकांना क्रीडांगणापासून वंचित राहावे लागणार असल्याने येथील येथील स्थानिक नागरिकांनी समाजसेवक दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेत क्रीडांगण, गोशाळा, गावातील नागरिक व आदिवासी समाजाच्या वस्त्यांचे व घरांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.


बापगाव येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर गावातील युवक खेळत असून पोलीस व सैन्य भरतीची तयारी करत असतात तसेच या मैदानावर विविध व सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते तसेच राम कृष्ण हरी गोशाळेसोबत येथील नागरिकांची धार्मिक नाळ जोडली गेली आहे.

सध्या ही गोशाळा नागरिकांच्या आस्थेचा विषय ठरली आहे.तर येथील आदिवासी कुटुंब देखील बेघर होणार असल्याने बापगाव येथील ९२ एकर क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकल्प प्रस्तावाबाबत आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी दयानंद चोरघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांची दखल घेतली असून लवकरच याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती दयानंद चोरघे यांनी दिली आहे.

Scroll to Top