वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस च्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू असून त्याच धर्तीवर भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली शेलार ते प्रांत कार्यालय पर्यंत जनप्रभोक्ष मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. त्यानंतर इंधन दरवाढीसह एल पी जी गॅस मधील दरवाढ, खाद्य पदार्थांच्या किमतीमध्ये झालेली वाढ तसेच साहित्यां वरील ३५ टक्के वॅट कमी करून ५ टक्के करावे, घरगुती गॅस वरील २२ टक्के वॅट कमी करावा या व अशा विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे. या आंदोलनात काँग्रेस भिवंडी शहराध्यक्ष आबीद मनसब खान व पदाधिकारी सहभागी झाले होते.


