शहरातील कोंबडपाडा परिसरातील प्रणिता कॉम्प्लेक्स या चारमजली इमारतीतील बी विंगमधील तळमजल्यावरील एका घराचा स्लॅब शुक्रवारी सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली
आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी घडली नसून घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंबडपाडा येथील प्रणिता कॉम्प्लेक्स मध्ये चार मजली इमारतीच्या बी विंगमध्ये राहणारे मनोज गायकवाड हे पत्नी व मुलासोबत राहत असून ते नेहमीप्रमाणे सकाळी ८ ते ८:३० वाजताच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाले असता अचानकपणे त्यांच्या घराच्या छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. दरम्यान सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून घरातील टीव्हीसह काही घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. घटना घडली त्यावेळी घरातील सदस्य सतर्क असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


