सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. आशिष शेलार यांची ग्वाही
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान संगमेश्वर कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. शेलार म्हणाले, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. भाजपचे आमदार प्रमोद जठार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. स्मारकाच्या प्रस्तावित जागेचा आढावा घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मी येथे आलो आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवरही भाष्य केले. यावेळी आमदार प्रमोद जठार, किरण सामंत, माजी आमदार डॉ. नातू, सहदेव बेटकर, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव, प्रशांत यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मारकाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मंत्र्यांनी आवश्यक सूचना दिल्या.


