कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक, रास्ता रोको करत केला निषेध

दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने उपनेते विजय साळवी यांच्या नेत्तृत्वाखाली आक्रमक होत आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको केला.

विद्यार्थ्यांच्या मागण्या विचारायला त्यांना वेळ नाही, संसदेवर जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचाच जर तुम्ही विचार करत नसाल तर देशाचा विचार काय करणार असा संतप्त सवाल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केला. दरम्यान या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते.

Scroll to Top