हेमंत कदम यांचा ‘महा ऍक्युपंक्चर रत्न २०२६’ पुरस्काराने गौरव

मागील दोन दशकांन पासून अॅक्युपंक्चरच्या माध्यमातून सातत्याने रुग्णसेवा बजावणारे सेंटर फॉर रिलीफचे संचालक हेमंत कदम यांना ‘महा ऍक्युपंक्चर रत्न २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व एजीएमए यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऍक्युपंक्चर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि दोन दशकांहून अधिक काळ केलेल्या समर्पित रुग्णसेवेची दखल घेत हेमंत कदम यांना हा सन्मान देण्यात आला. या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागांतील अॅक्युपंक्चर थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते सुयोग गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. नाझेर काझी, ऍड. दत्तात्रय जाधव आणि ऍड. नागेश सोनवणे उपस्थित होते.

तसेच व्यासपीठावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघूळदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top