टोलनाक्यापासून अवघ्या १०० मीटरवर महामार्गाची दुरवस्था; एन.एच.ए. आय व टोल व्यवस्थापनाविरोधात नागरिकांचा संताप
भिवंडी- भिवंडी तालुक्यातील पड्या
अर्जुनली टोल नाक्यासमोरील मुंबई – नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था वाहनचालकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. टोल नाक्यापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावरील रस्ता मोठमोठ्या खड्यांनी विदीर्ण झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रयास करावा लागत आहे. एकीकडे नियमितपणे टोलची वसुली सुरू असताना दुसरीकडे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गापैकी एक असलेल्या मुंबई – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र हजारो लहान-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे या मार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेषता पडघा – अर्जुनली टोल नाक्यासमोरील खड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघाताचा धोका वाढल आहे.
खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साच असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाह त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक, एसब व खासगी बसचालक, रुग्णवाहिका तसे शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करत प्रवा करावा लागत आहे. अनेक वाहनचालक अपघात टाळण्यासाठी वेग कमी करून कासवगतीने वाहन चालवत असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित यंत्रणेकडून खड्डे केवळ तात्पुरत्या स्वरूपात बुजवले जातात. मात्र, पाऊस पडताच ते पुन्हा उखडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना पडघा टोल व्यवस्थापन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमितपणे टोल वसूल केला जात असताना वाहनचालकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याने संतापाची भावना वाढत आहे.
विशेष म्हणजे, विविध लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारीही याच मार्गाचा नियमित वापर करतात. तरीही या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पडधा अर्जुनली टोलनाक्या समोरील धोकादायक खड्डे तातडीने कायमस्वरूपी बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन याकडे किती तातडीने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


