जिल्हा परिषद शाळा, मोरघेपाडा या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आबिटघर जवळील जिल्हा परिषद शाळा, मोरघेपाडा या शाळेतील ‘गुणवत्ता शोध परीक्षेत’ उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ सूर्यवंशी यांनी छोटेखाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, आजचे विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून योग्य वेळी प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सरपंच साक्षी साठे यांनी आपले विचार मांडून ग्रामपंचायत हद्दीतील शाळांमधील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते, सरपंच साक्षी साठे, विस्तार अधिकारी संजय पहाड, केंद्र प्रमुख घनश्याम कांबळे, मुख्याध्यापक गोपाळ सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रज्ञा भोंडवे, आबिटघर शाळा मुख्याध्यापक देवानंद पाटील व पालक वर्ग उपस्थित होते.


