गतिक किर्तीव प्रतिभावंत, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव म्हणून १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून सार्वजनिक वाचनालय कल्याणमध्ये संपन्न झाला. वाचनालयाचे ज्येष्ठ वाचक वर्षा जयंत भोईर, निलेश कदम व सुधाकर कांबळी यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या साहित्याचे पूजन करण्यात आले.
वाचनालयाच्या ग्रंथ सेविका हर्षदा हिवाळे, संगिता लोखंडे, सहग्रंथपाल करूणा कल्याणकर यांनी साहित्यरत्न लोकशाह अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यामधील उता-यांचे सामुहिक वाचा केले. ज्येष्ठ वावक सुधाकर कांबळी यांनी त्यांच्या मनोगतात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला उपस्थितांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका व वाचक वर्ग उपस्थित होता.


