भिवंडी महापालिकेच्या १६ विद्यार्थ्यांच्या दिल्ली शैक्षणीक सहलीला महापौर आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा

भिवंडी महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठी उर्दू हिंदी माध्यमातील निवडक १६ विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहलीसाठी निवड करण्यात आली असून सोमवारी (१७) रोजी त्यांच्या प्रवासाच्या बसला महापौर नारायण चौधरी आयुक्त अनमोल सागर यांनी हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी आमदार रईस शेख, उपमहापौर तारीक मोमिन, स्थायी समिती सभापती ईशा इम्रान खान, उपायुक्त (शिक्षण) बाळकृष्ण क्षिरसागर, सहायक आयुक्त (शिक्षण) नितीन पाटील, सभापती प्रभाग समिती क्रमांक एक हसनैन फारुकी, नगरसेवक व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना २५ जून रोजी झालेल्या पुस्तक वितरण कार्यक्रमात आयुक्त अनमोल सागर यांनी अभ्यासात हुशार असणारे नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहल आयोजनाची संकल्पना बोलून दाखविली होती. त्यानुसार या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्या मागील उद्देश या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करणे व नियमित शाळेत उपस्थित राहणे हा असल्याचे शेवटी आयुक्त अनमोल सागर यांनी स्पष्ट केले आहे.

या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना लोकशाही मधील पवित्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसद भवन, जगातील सर्वात माठी लोकशाही प्रणाली असलेल्या देशाच्या प्रमुखाचे कार्यालय असलेले राष्ट्रपती भवन
व प्रधानमंत्री संग्रहालय दाखविण्यात येणार आहे. या सहली साठी ९ वी व १० वी मधील १६ विद्यार्थी दोन शिक्षक व एक अधिकारी अशा १९ जणांचा समूह जाणार असून यास आज हिरवा झेंडा दाखवून मान्यवरांनी शुभेच्छा
दिल्या आहेत.

Scroll to Top