कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक भोईर यांची बिनविरोध निवड

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक अशोक भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या भोईर यांच्यावर बाजार समितीची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर अशोक भोईर यांनी आमदार किसन कथोरे तसेच टीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील यांचे आभार मानले. “आमदार किसन कथोरे आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ही जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे,” असे भोईर यांनी सांगितले.

येत्या दोन ते तीन महिन्यांत आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे व सुसज्ज मार्केट यार्ड उभारण्याचा मानस असल्याचेही अशोक भोईर यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Scroll to Top