ठाणे शहरातील राबोडी, वृंदावन, श्रीरंग, साकेत परिसरात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संजीवनी बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार २२ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून काल्हेर भिवंडी येथील स्मित वृद्धाश्रम व सुश्रूषा फाउंडेशन येथे आश्रयास असलेल्या १६० वृद्ध स्त्री-पुरुषांना भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
स्मित वृद्धाश्रम व सुश्रूषा फाउंडेशन, काल्हेर भिवंडी या संस्थेच्या संस्थापिका योजना घरत यांनी उपस्थितांना वृद्धाश्रमाच्या कार्याची माहिती दिली. संजीवनी बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डी. के. जाधव, अध्यक्ष अजित मोहिते, रमाकांत भोसले, समीर साबळे, रामचंद्र गमरे, महेंद्र जाधव, संजय पांडव, बाळू सोनावणे, अरुण तांबे, रविंद्र भोसले, पी. के. जाधव, रमेश कांबळे, धम्मशील कांबळे यांनी वृद्धांना भेटून त्यांना आणलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व वृद्धाश्रम संस्थापिकांना भारतीय संविधानाची प्रत सन्मानार्थ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सुधाकर माळी, अफझल खान, शशिकांत पवार, गांगुर्डे, सुबोध नारकर, बाळू सोनावणे, रविंद्र भोसले, भास्कर साळुंके, विनायक काजवे, जनार्दन कदम, सुभाष विशे, तौफिक शेख, धम्मशील कांबळे, श्री. पाटील, संदीप सिंग, संतोष राजवाडकर तसेच शरद शिंदे व अखिलेश प्रधान, सुभाष जाधव, हंबीरराव गायकवाड, संजय गायकवाड, विजय धीवर, शशी गमरे यांनी विशेष सहकार्य केले.
संजीवनी बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



