काजूवाडी मित्र मंडळ गणेशोत्सव अध्यक्ष तथा माजी महापौर अशोक वैती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संगीत विशारद प्रभाकर कश्यप यांचे मराठी, हिंदी भक्ती गीतांवर गायन संपन्न झाले. यावेळी प्रभाकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कश्यप यांनी कानडा राजा पंढरीचा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, अभिर गुलाल उधळीत रंग, इंद्रायणी काठी, कैवल्याच्या चांदण्याला आणि हिंदीमध्ये चदरिया जीली रे, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री रामचंद्र कृपाल भज मन, पायोजी मैंने राम रतन पाये अशी गीते सादर केली. यावेळी त्यांना तबल्यावर स्वानंद गुडेकर, हार्मोनियम वर प्रदीप मोरे, मंजिरीवर अक्षय दिरावने यांनी संगती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक तथा माजी महापौर अशोक वैती यांनी प्रभाकर कश्यप यांचे विशेष कौतुक करत सन्मान केला.
काजूवाडी गणेशोत्सवात प्रभाकर कश्यप यांचे गायन संपन्न



