भिवंडीत जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेलीची अवयवदान जनजागृती मोहीम

भिवंडीत जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेलीची अवयवदान जनजागृती मोहीम

जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेलीच्या वतीने जायंट्स वीक सेलिब्रेशनच्या तिसऱ्या दिवशी अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरातील दहा गणपती मंडपांमध्ये ‘Recycle Life – अवयवदानाचा संकल्प करा’ या संदेशाचे बॅनर वितरित करून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या उपक्रमाचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष रवी सावंत, महासचिव विकास बाफना आणि विकी चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये एक निर्णय तुमचा, जीव वाचवू शकतो कोणाचा… आजच संकल्प करा अवयवदानाचा!’ या संदेशातून नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी जीडब्ल्यूएफ फेडरेशन १-सीच्या अध्यक्षा मनीषा भांगरे, कौन्सिल मेंबर यशवंती बिल्लावा, उपाध्यक्षा ज्योती अग्रवाल, राजेश्री हिरे तसेच जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेलीच्या अध्यक्षा दर्शना खत्री यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Scroll to Top