मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने समता सामाजिक फाउंडेशनच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार शंकर करडे संपादित ‘विकासाचा नवा पॅटर्न’ या विशेषांकाचे प्रकाशन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
मुरबाडच्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या पत्रकार शंकर करडे संपादीत विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यास आमदार किसन कथोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेषांकामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, कृषी तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध विकासकामे आणि उपक्रमांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मुरबाडच्या विकासाची वाटचाल, विविध शासकीय योजना आणि झालेल्या विकासकामांचा आढावा वाचकांना या विशेषांकातून मिळणार आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर चष्याची आवश्यकता असलेल्या गरजू नागरिकांना मोफत चषयांचे वाटप करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी हा उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रम उपयुक्त ठरला. वाढदिवस केवळ बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार किसन कथोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांकडून शुभेच्छा संदेश प्राप्त झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
समता सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शंकर करडे हे गेल्या दहा वर्षांपासून आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच विशेषांकाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यंदाच्या विशेषांकातून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि विविध क्षेत्रांतील उपक्रमांची माहिती एकत्रितपणे जनतेसमोर आणण्यात आली आहे.
‘विकासाचा नवा पॅटर्न’ हा विशेषांक मुरबाडच्या विकासकामांची माहिती जतन करणारा दस्तऐवज ठरणार असून, वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांमुळे या सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला आर पी याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब भाई पैठणकर, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता राजन घोरपडे, टीडीसी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, मा. अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद मा. सदस्य उल्हासभाऊ बांगर, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, धसई सेवा सोसायटीचे चेअरमन परेश मोरे, सुहास मोरे, अनिल घरत, विनायक राव, सागर चंबावणे, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पवार, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविदे, उद्योजक अनिल पांडे, नम्रताताई ठाकरे, सरपंच रेश्माताई घरत, प्रकाश पवार, उद्योजक मेघराज तुपांगे, प्रथमेश भोईर, नगरसेवक अक्षय रोठे, मा. नगरसेवक रवींद्र देसले, आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे,, उद्योजक संतोष गोंधळी, युवा नेते नरेश मोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



