विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वंचित घटकांच्या मतदार नोंदणीबाबत समन्वय बैठक संपन्न

वंचित घटकांच्या मतदार नोंदणीबाबत समन्वय बैठक संपन्न

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ अंतर्गत दावे व हरकतींच्या कालावधीत पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्या दालनामध्ये संबंधित शासकीय विभाग व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न झाली.
या बैठकीस सुजाता शिंदे-गावंड, तहसिलदार निवडणूक, संतोष भोसले, बाल विकास प्रकल्प अधिकारी भिवंडी (प) सोपान भाईक, सहायक आयुक्त निवडणूक ठाणे महापालिका, मनिष वाघमारे, व्यवस्थापक समाज विकास विभाग ठाणे महापालिका, मिथुन म्हात्रे, समाज सेवक नवी मुंबई महापालिका, विशाल गायकवाड, चंद्रकला भोसले, प्रयास संस्था, अशोक भोईर, District PWD Icon, अध्यक्ष अपंग विकास महासंघ कल्याण प्राधिकारी, ठाणे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व सामाजिक संस्थांचे संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महिला, तृतीयपंथी, महिला लैंगिक कामगार (FSW), दिव्यांग व्यक्ती (PWD), आदिवासी, भटक्या-विमुक्त जमाती तसेच इतर वंचित व दुर्बल घटकांतील पात्र नागरिकांची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र नागरिकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होऊन एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे जनजागृती व कार्यवाही करावी, असे यावेळी माने यांनी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Scroll to Top