माय मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

माय मराठी प्रतिष्ठानतर्फे मराठी माणसांचे हिताचे रक्षण करणे व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. योगीधाम कल्याण (प) परिसरात दरवर्षीप्रमाणे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला व त्याचे औचित्याने परिसरातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेले व्यक्ती व शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केला गेला डॉ. शिल्पा गजभिये यांनी ब्रेस्ट कॅन्सर क्षेत्रात संशोधन करून पीएचडी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. शोभा तायडे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. संदीप पाटील यांचे विवध सामाजिक कार्यसाठी सत्कार करण्यात आला. डॉ. संजय लाटकर यांनी मानसिक स्वास्थ व मानसशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. योगीधाम वरिष्ठ नागरिक सेवा संस्थेचे पदाधिकारी दिलीप गांगुर्डे, सुनील परब, बन्सी भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी एकनाथ लब्दे, प्रवीण जाधव, विकी सोनावणे यांची अनुक्रमे अध्यक्ष, सचिव, खजिनदार पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. सुरेंद्र परब यांनी राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. राजोळे नाना यांनी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविले. प्रांजळ गवळी (चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण) केली. ध्रुव शिरसाट (JEE All lindia ९३%), शयन वानखेडे दहावीत ९३%, शौर्य गायकवाड दहावीत ९४%, तनुश्री अंतरे (JEE Main Qualify), अंतरा सरगर दहावीत ८८%, श्रावणी दळवी ९३%, सेजल सपकाळ (NEET Preparation), विधी वीरकर हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट पाळणा गीत सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. सिद्धार्थ घाटवीसावे यांनी महारष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. वायगावकर व विधी वीरकर यांनी उत्कृष्ट आवाजात राज्यगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माय मराठी प्रतिष्ठान अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर, खजिनदार जितेंद्र सावंत व पदाधिकारी संदीप अंतरे, दिलीप सोनावणे, चेतन निकम, विशाल यशवंतराव, रुपेश सावंत, पंकज ठाकरे, सुनील रोकडे, विनोद वीरकर, आदित्य सावंत, वैशाली गरुड, सुनंदा सोनावणे, छाया सावंत, प्रमोद गायकवाड, सुरेंद्र परब, सुभाष तानवडे, संजीव गायकवाड व इतर मराठी बांधवानी परिश्रम घेतेले व कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top