राज्यस्तरीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात बाळासाहेब तोरस्कर सन्मानित.

येथील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना राज्यस्तरीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष कवी अशोक भोईटे व नशाबंदी महाराष्ट्र राज्य मंडळाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख स्वागताध्यक्ष सुरेश सकटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी अभिनेत्री आदिती सारंगधर, उमाकांत आदमाने व कवयित्री स्वप्नज्या घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे साहित्यसंमेलन भारतीय साहित्य मंडळ व नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय लेखणी मराठी साहित्य संमेलन नुकतेच कोल्हापूर येथील विद्याभवन मध्ये आयोजित करण्यात आले होते. सलग आठ तास चाललेल्या या कवी संमेलनात राज्यभरातून एक हजारावर तरुण-तरुणी आल्या होत्या. या ह संमेलनामध्ये उत्कृष्ट साहित्यिक असलेल्या आठ साहित्यिकांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाळासाहेब तोरस्कर यांनी आपली राजा शिवाजी ही कविता एकदम जोशपूर्ण आवाजात सादर करून रसिकांची दाद मिळविली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top