डी-मार्टचा निष्काळजीपणा उघड; एक्सपायरी केक विक्रीवर संताप

whatsapp image 2026 05 07 at 17.45.00

ठाणे शहरातील ढोकाळी परिसरातील D Mart मध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या केकची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. Britannia Industries च्या Gobbles बँडचे केक एक्सपायर होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित केकची एक्सपायरी तारीख 19 एप्रिल 2026 होती. मात्र 2 मे 2026 रोजीदेखील सुमारे 50 हून अधिक पाकिटे विक्रीसाठी रॅकमध्ये ठेवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या उत्पादनांची बिलिंगदेखील सुरू होती.
हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा ग्राहक मिलिंद जाधव यांनी 30 एप्रिल रोजी हा प्रॉडक्ट खरेदी केला. त्यांनी 2 मेच्या संध्याकाळी केक खाल्ल्यानंतर पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर प्रॉडक्टवरील तारीख तपासली असता तो केक 19 एप्रिललाच एक्सपायर झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर पुन्हा डी-मार्टमध्ये जाऊन पाहणी केली असता, एक्सपायरी डेटचे केक मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये ठेवून विक्री सुरू असल्याचे दिसून आले. माहिती मिळताच ठाणे भाजपचे अखिलेश पाल, राकेश मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन व्हिडिओ व फोटोद्वारे पुरावे गोळा केले आणि हा प्रकार उघड केला.
विशेष म्हणजे हे केक लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे एक्सपायरी खाद्यपदार्थांची विक्री ही मुलांच्या आरोग्यासह जीवासाठीही धोका ठरू शकते. हा प्रकार भाजपचे अखिलेश पाल, शिवसेना (उबाठा) प्रदीप पुर्णेकर, मिलिंद जाधव आणि राकेश मिश्रा यांच्या सतर्कतेमुळे समोर आला.
याप्रकरणी अखिलेश पाल आणि मिलिंद जाधव यांनी पुराव्यांसह कापूरबावडी पोलीस स्टेशन तसेच FDA कडे तक्रार दाखल करून डी-मार्टवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top