भिवंडीत ५ लाखांची पाणीचोरी उघड, पालिका भरारी पथकाच्या कारवाईनंतर गुन्हा दाखल

भिवंडी शहरात पाणी चोरी मुळे अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने अनेकांकडून ओरड होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पाणीचोरी करणाऱ्यां वर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर शहरातील टेमघर परिसरात पाणी चोरी करणाऱ्या वर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरात पाणी चोरी मुळे अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने अनेकांकडून ओरड होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पाणीचोरी करणाऱ्यां वर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर शहरातील टेमघर परिसरात पाणी चोरी करणाऱ्या वर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेमघर सोनादेवी मैदानाजवळ पाहणी केली असता टेमघर गावा करीता २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पिंपळास येथील आकाश घरत यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवागनी न घेता छिद्र पाडून एक इंच व्यासाचे तीन नळ जोडणी अनाधिकृतरित्या घेऊन त्याचा वापर ग्रामीण भागातील भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्क येथील वासुदेव घरत वॉटर सप्लाय यांच्या एका गाळ्यात ५००० लिटर पाणी क्षमतेच्या ८ टाक्यांमधून पाणी साठवणूक करून तेथे पाण्याचे बाटले भरून व्यापारी वापर करीत विक्री करीत असल्याचे आढळून आले.

पथकानेयेथील संपूर्ण पाईप लाईन खोदून काढत या ठिकाणी चार वर्ष पाणीचोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने ५लाख ४ हजार रुपयांची पाणीचोरी केल्याचे उघड झाले. आकाशघरत याने पालिकेचे आर्थिक
नुकसान करणे, पाण्याचा प्रवाहवळते करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी आकाश घरत याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२४(४),३२६ (क) प्रमाणे शांतीनगर पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top