महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात बेघर हटविण्याची कारवाई करण्यात आली.
ओ विभाग कार्यालय बेलापूर मार्फत बेघर हटविणेसाठी कारवाईचे आयोजन करुन, L&T ब्रिज खालील सेक्टर-42, सिवूड्स व नेरुळ सेक्टर-25 नवी मुंबई, येथील बेघर हटविण्यात आले व त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले, या धडक मोहिमेसाठी ओ विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, श्री. प्रशांत नेरकर, तसेच विभाग कार्यालय बेलापूर, नेरुळ, घणसोली, ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेसाठी
या विभागातील मजूर, वाहने इत्यादी मनुष्यबळ व साधनसामुग्री वापरण्यात आली. तसेच स्थानिक पोलीस विभागातील अधिकारी/कर्मचारी व अतिक्रमण विभागातील पोलिस अधिकारी/कर्मचारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.


