मौजे पिंपळगाव, भालुक, डेहणोळी व काकडपाडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्ताहानिमित्त परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित मान्यवर, वारकरी, युवा, ग्रामस्थ तसेच महिला भाविकांनी एकमेकांशी संवाद साधत धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. सप्ताहाच्या कार्यक्रमात सुभाष पवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, रामभाऊ दळवी अण्णा, चंद्रकांत साने, दामोदर ठाकरे, बळीराम आगिवले, बाळकृष्ण पवार, नानू पवार, जगन्नाथ आगिवले, लक्ष्मण साने, प्रताप पगार, विलास लोटे, जगदीश हिंदोळे, दत्तू पवार, नानू लोटे, दीपक घरत, जगन घागस यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ, युवा व महिला भाविक उपस्थित होते.
यावेळी धार्मिक कार्यक्रमांसोबतच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वारकरी परंपरेतील अभंग, भजन, हरिपाठ आणि नामस्मरणामुळे वातावरणात भक्तीमय ऊर्जा निर्माण झाली होती. महिला व पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सप्ताहाची शोभा वाढवली.ऽअखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा जपत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील नागरिक एकत्र आल्याने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, वारकरी मंडळी, ग्रामस्थ, महिला व युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सप्ताहामुळे परिसरातील भाविकांना अध्यात्मिक समाधान मिळाले असून, पुढील काळातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना सुभाष पवार यांनी व्यक्त केली.
पिंपळगाव, भालुक, डेहणोळी व काकडपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात



