सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘प्लॉग रन २०२६’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

'प्लॉग रन २०२६' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरा भाईंदर वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत एक दिवस, एक तास, एकसाथ’ स्वच्छतेसाठी ‘प्लॉग रन २०२६’ या उपक्रमाचे दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक ०१ ते ०६ अंतर्गत विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, सामाजिक व सेवाभावी संस्था, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अंदाजे 3500 ते महानगरपालिकेच्या 4000 नागरिकांनी सहभाग नोंदविला. ‘प्लॉग रन’च्या माध्यमातून नागरिकांनी चालताना व धावताना रस्त्यांच्या तसेच सार्वजनिक परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा संकलित करून परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे, नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे तसेच प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याबाबत या उपक्रमातून जनजागृती करण्यात आली.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्लॉग रनमध्ये अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. नागरिकांचा स्वच्छता उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग वाढविणे आणि ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून शहराच्या स्वच्छतेसाठी सामूहिक सहभाग निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्वच्छता ही केवळ
महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्लॉग रनसारख्या उपक्रमांमधून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी स्वच्छतेचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत तसेच परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमास मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण बँड अॅम्बेसेडर कु. त्रिशा ठोसर यांचीही उपस्थिती लाभली. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व यावर आधारित जनजागृतीपर नाटिका सादर केली.

Scroll to Top