ठाणे वार्ता बातमी तीच, जी सत्य असेल!’महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे-प्रताप सरनाईक

१८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही

१८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही

महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे ही केवळ अपेक्षा नसून सामाजिक जबाबदारी आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि अॅपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये. ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करून येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी
साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, राज्यात अद्याप सुमारे ८ ते साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, राज्यात अद्याप सुमारे ८ ते ९ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि अॅपआधारित वाहने चालवत आहेत. त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मर्यादित वेळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी भाषा शिकवणे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकलेली नाही त्यांनी तातडीने प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवावे अथवा ऑनलाईन पद्धतीने मराठी भाषा शिकावी असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. दरम्यान, व्यवहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांनी काही रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा, असे मंत्री सरनाईक यांनी जाणार नाही
मुंबई :
महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे ही केवळ अपेक्षा नसून सामाजिक जबाबदारी आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि अॅपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये. ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करून येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी
साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, राज्यात अद्याप सुमारे ८ ते ९ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी
आणि अॅपआधारित वाहने चालवत आहेत. त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मर्यादित वेळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी भाषा शिकवणे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकलेली नाही त्यांनी तातडीने प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवावे अथवा ऑनलाईन पद्धतीने मराठी भाषा शिकावी असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. दरम्यान, व्यवहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांनी काही रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा, असे मंत्री सरनाईक यांनी
सांगितले आहे. “मराठी शिकण्यासाठी शासनाने प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. स्थगिती ही मराठी शिकण्यापासून पळ काढण्याची संधी नाही, तर स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली मुदत आहे. या मुदतीत व्यावहारिक मराठी शिकून घ्या. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपण्याबरोबरच प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यामुळे “आज मराठी शिका, उद्याची कारवाई टाळा”, असा स्पष्ट संदेश देत अमराठी चालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

Scroll to Top