अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका अध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका अध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अधिक सक्षम करण्याच्या हेतूने भिवंडी तालुका नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये येवई येथील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती महाराष्ट्र युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केली आहे. येवई येथे आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष कृष्ण कुमार होबरे, शहापूर तालुका कार्याध्यक्ष भरत धोंगडे, सचिन राणे, अशोक बुधर, सुदाम पांगी, राजेश भेकरे, गुरु बारी, हनुमान पांगी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका सचिवपदी एकनाथ घाटाळ, युवा अध्यक्षपदी संकेत वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या हस्ते पदनियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाच्या शिक्षण, रोजगार, जमीन, घरकुल, शासकीय योजना, मूलभूत सुविधा आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत संघटितपणे काम करण्याची गरज व्यक्त करीत, समाजातील नागरिकांच्या अडचणी प्रशासना पर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ही आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावपातळी पासून तालुकास्तरापर्यंत संघटन मजबूत करण्याचा आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या पदनियुक्तीमुळे भिवंडी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांना नवे नेतृत्व आणि संघटित दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Scroll to Top