माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांच्या पाठपुराव्याला यश; मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तसेच माजी उप महापौर राजेंद्र साप्ते यांच्या पाठपुराव्यातुन उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे व्यायामशाळा व सभागृहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यास शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना ठाणे शहरप्रमुख तथा माजी महापौर अशोक वैती, विरोधी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे व्यायामशाळेची निर्मिती करताना पाठपुरावा केल्याबद्दल अशोक बारकू वैती व शानू पठाण यांनी राजेंद्र साप्ते यांचं पुष्पकच्छ देऊन सन्मान केला. पक्षनेते शानू पठाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच सामाजिक, सांस्कृतिक व विविध सार्वजनिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने व्यायामशाळा व सभागृहाची उभारणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिक आणि युवकांना मोठा लाभ होणार असून, सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.
या सोहळ्याला सर्व शिवसेना महिला पदाधिकारीच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्वाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह आणि भव्यता प्राप्त झाली, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग हा संघटनात्मक एकजूट आणि जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरला.



