कोरम मॉलमध्ये ‘गोल्डन दांडिया’चा जल्लोष; १० ग्रॅम सोन्याची नाणी जिंकण्याची संधी

कोरम मॉलमध्ये ‘गोल्डन दांडिया’चा जल्लोष; १० ग्रॅम सोन्याची नाणी जिंकण्याची संधी!

ठाणे: नवरात्रीच्या उत्साहाला मनोरंजनाची आणि बक्षिसांची जोड देत ठाण्यातील कोरम मॉलमध्ये वार्षिक ‘गोल्डन दांडिया’ उत्सवाला सुरुवात झाली आहे. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात गरबा, दांडिया, लाइव्ह संगीत, डीजे परफॉर्मन्स आणि आकर्षक बक्षिसांचा आनंद ठाणेकरांना घेता येणार आहे. या सोहळ्यात एकूण १० ग्रॅम सोन्याच्या नाण्यांची बक्षिसे जिंकण्याची संधी सहभागींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवरात्रीच्या आवडत्या रंगांमध्ये सजून दररोज संध्याकाळी लाइव्ह डीजेच्या तालावर गरबा आणि दांडियाचा आनंद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘गोल्डन दांडिया कॉन्टेस्ट’. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना एकूण १० ग्रॅम सोन्याच्या नाण्यांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, विविध आकर्षक भेटवस्तूंचीही मेजवानी उत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी असणार आहे.
उत्सवाचा आनंद अधिक सुखकर व्हावा यासाठी कोरम मॉलमध्ये पूर्णपणे वातानुकूलित इनडोअर परिसराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त पार्किंग आणि आधुनिक सुविधांमुळे कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच गरबा आणि दांडियाप्रेमींना या उत्सवाचा आनंद आरामात घेता येणार आहे.
परंपरा, संगीत, मनोरंजन आणि आकर्षक बक्षिसे यांचा सुरेख संगम साधत कोरम मॉलने ठाणेकरांसाठी नवरात्री साजरी करण्याचे एक उत्साहपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत ‘गोल्डन दांडिया ‘च्या तालावर ठाणेकरांना उत्सवाचा आनंद लुटण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

Scroll to Top