उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सौ. कल्पना जितेश मोरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार कळवा – गेली ११ वर्षे सातत्याने काँज फाउंडेशनच्या माध्यमातून 

1740590

 सौ. कल्पना जितेश मोरे  या  समाजसेवा करत आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेचा आणि सक्षमीकरणाचा ध्यास घेत त्यांनी अनेक परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. समाजात महिला व बाल सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सामाजिक कार्याची गौरवपूर्ण कामगिरी केल्याबद्दल १ मे महाराष्ट्र दिन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, आमदार संजय केळकर इतर मान्यवर उपस्थित होते. स्त्री सुरक्षा व सक्षमीकरणासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या भरोसा सेल सोबत महिला तक्रार निवारण व समुपदेशनाच्या कार्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 

आजपर्यंत त्यांनी विद्यार्थी सुरक्षेसाठी १,१०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचून जनजागृती केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top