ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी वर्षभर वाहतूक बदल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे आणि बोरिवली मार्गातील भुयारी प्रकल्पाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरु आहे. या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुल्लाबाग भागात वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल शनिवार १६ मे २०२६ ते १५ मे २०२७म्हणजेच, वर्षभरासाठी लागू झाले आहेत. ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने या वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरून हजारो जड-अवजड वाहने, हलकी वाहने घोडबंदर घाट मार्गावरुन गुजरात, वसई-विरार, बोरिवली, मिरा-भाईंदरच्या दिशेने वाहतूक करतात. घाट रस्त्यात मार्गिका अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतो. ठाणे येथून अवघ्या काही मिनीटांत

बोरिवली गाठण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गिका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भुयारी मार्गिका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.

या बदलानुसार, मुल्ला बाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुलापासून निळकंठ ग्रीन या गृहसंकुलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना सत्या-शंकर सोसायटी या गृहसंकुलाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने निळकंठ ग्रीन गृहसंकुलाजवळून विरुद्ध दिशेने वाहतूक करतील. शनिवार १६ मे २०२६ ते १५ मे २०२७ म्हणजेच, वर्षभरासाठी लागू झाले आहेत. ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने या वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top