थाळीनाद करीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्या नेतृत्वाखाली तथा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी लाटणे मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळेच महागाई वाढली असल्याचा आरोप करीत जोरदार थालीनादही केला.
पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात अवघ्या एका आठवड्यात दोन वेळा दरवाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने ही दरवाढ आपल्या भांडवलदार मित्रांसाठी केली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा – काढण्यात आला होताकार्यालय गाठले. विविध घोषणा या मोर्चेकऱ्यांनी दिल्या. तसेच, यावेळी मेलोडी चॉकलेटचे वाटपही करण्यात आले. या मोर्चात बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या – होत्या. मोर्चेकरी महिलांनी हातात – घेतलेल्या पोळीपाट, लाटणे थाळी – चमचा यांचा नाद करीत जिल्हाधिकारी या आंदोलनात महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, नगरसेविका पल्लवी जगताप, मर्जिया पठाण, शशिकला पुजारी, माधुरी सोनार, कमरजा मुलानी, मनिषा पाटील, ज्योती निंबर्गी, रुबीना शेख, रेश्मा भानुशाली, सपना पाटील , मेघा गवते, शायना अजमी, नूर अहमदी , पूजा शिंदे, दीपा गावंड, कल्पना नार्वेकर, गायत्री आर्यमाने, उषा नरहरे , गीता रंजन, अक्षता अचरेकर, अलका शिंदे, शमिता मार्गावकर, सुजाता गायकवाड, प्रीती शर्मा, चंपा राय, मेघना शेट्टी, जैतून शेख, आजमा पटणी , साकिबा शेख, फातमा सय्यद, नेहा चव्हाण आदी सहभागी झाले होते.


