मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी दिनांक २२ मे २०२६ रोजी महापालिकेचे मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्सून पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक आणि तत्काळ उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभागप्रमुख आणि प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्व प्रभागांतील धोकादायक यावेळी शहरातील सर्व प्रभागांतील धोकादायक इमारतींचे रिकामीकरण, नोटीस प्रक्रिया, आणिनागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
आयुक्त यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले की, प्रत्येक धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या कारवाई तातडीने करण्यात याव्या. तसेच, पोलिस विभागासह योग्य समन्वय राखत आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याचेही नियोजन करून इमारतींच्या रिकामीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


