नाशेबाजाचा धुमाकूळ थांबवण्यात पोलीस अपयश
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व परिसरातील अलाना कंपनी नजीक गणपती पाडा येथे स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत पार केलेल्या १० गाड्या काही नशेबाजांनी फोडल्याचा प्रकार घडला आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंतची ही तिसरी घटना आहे. या प्रभागात मद्यपी तसेच नगर जिल्ह्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. रात्रीभर बिनधास्तपणे या ठिकाणी नशेबाज ठाण मांडून बसलेले असतात. स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही तसेच पोलीस बीटचौकी उभारण्याची मागणी केली आहे परंतु कळवा पोलिसांकडून कोणत्याही उपाय योजना करण्यात येत नसल्याने नागरिकांचा संताप अशा घटनांमुळे वाढत चालला आहे.


