शिवसेना सहा बंडखोर खासदारांविरोधात संपूर्ण राज्यात शिवसैनिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. भिवंडीत रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी विरोधात खासदार यांच्या फोटोला जोडे मारून आपला आक्रोश व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी जिल्हा सह संपर्क प्रमुख मनोज गगे, मोहन बल्लाळ, राजा पुण्यार्थी, जिल्हा सचिव जय भगत, अरुण पाटील, महेंद्र कुंभारे, प्रदीप बोडके, गजेंद्र गुळवी, तालुका सचिव सचिन पाटील, महिला उपजिल्हा संघटक कविता भगत, वैशाली मेस्त्री, सुनीता पाटील, कविता म्हात्रे, संगीता जोशी, सविता मांजरेकर, वर्ष पाटील यांसह शिवसैनिक सहभागी झाले होते. निष्ठावान शिवसैनिक हा गद्दारांना कधी ही माफ करणार नाही. गद्दारी करणारे हे मोदी व मींध्ये यांच्या चेहऱ्यावर नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना शिवसैनिक त्यांची जागा दाखवून देतील अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांनी दिली आहे.


