शहरात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.
पावसाच्या आगमनामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील बळीराजा सुखावला आहे.
मात्र पहिल्याच पावसात शहरातील नालेसफाईचा मनपा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून नाले सफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे. शहरातील तीन बत्ती परिसरात अर्धा फुटापर्यंत पाणी साचल्याने रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
शहरातील सखल भागात पाणी तुंबू नये यासाठी मनपा प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून नाले सफाईचे ठेके दिले आहेत. मात्र ठेकेदारांनी नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा केला असल्याचे चित्र पहिल्याच पावसात समोर आले आहे. त्यामुळे या ठेकेदारांवर महापौर नारायण चौधरी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे.


