महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत भाजपा युवा मोर्चाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विक्रम तरे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून, या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिला व मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेत एका मागोमाग एक अशा दोन अत्याचाराच्या घटना घडल्या. कल्याण पूर्वेत कायदा सुव्यवस्था बिघडली असून याबाबत पोलीस उपायुक्तांना भेटून पुण्याच्या धर्तीवर जलदगतीने तपास करण्याची मागणी केली असल्याचे विक्रम तरे यांनी सांगितले.

Scroll to Top