ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ही महायुती विरुद्ध महायुती अशीच होत होती. एकनाथ शिंदे-हितेंद्र ठाकूर-किसन कथोरे यांच्या युती विरोधात भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांची लढत होती. या प्रस्थापितांच्या लढतीमध्ये दोन मुख्य पॅनलमध्ये स्थान न मिळालेल्या निलेश सांबरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना धुळ चारत विजय संपादन केला असून त्यांची संचालकपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध त्यांनी अत्यंत अटीतटीची लढत दिली. या लढतीत अवघ्या १०० मतांचेच अंतर राहिल्याने, सांबरे यांनी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला आणि गडाला मोठे सुरुंग लावल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी ज्या प्रस्थापितांनी निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निकालाने सांबरेंनी आपली ताकद दाखवून दिली. पाठीशी कोणत्याही मोठ्या पॅनेलचा किंवा राजकीय गॉडफादरचा आधार नसतानाही निलेश सांबरे यांनी स्वतःच्या बळावर मोठा विजय मिळवला.

Scroll to Top