खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली संरक्षक भिंत कोसळलेल्या घटनास्थळाची पाहणी

डोंबिवलीतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या सूतिकागृह आणि कर्क रोग रुग्णालयाच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे ५० फूट खोल खड्ड्यालगत मुसळधार पावसामुळे माती खचून संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांसोबत संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, हे स्पष्ट करत तातडीने आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने संरक्षक कामे आणि संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top