आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
आमदार विलास तरे यांनी तुंगार फाटा येथील डी-मार्ट परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील पाणी साचणाऱ्या विविध ठिकाणांची पाहणी करून जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला. पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याने तातडीने पाण्याचा निचरा करण्याबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच वसई विरार शहर तरे मैदानात
मनोर :
पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांना निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी विविध अतिवृष्टीग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आमदार विलास तरे यांनी तुंगार फाटा येथील डी-मार्ट परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पाणी साचणाऱ्या विविध ठिकाणांची पाहणी करून जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला. पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊन अपघाताचा धोका
वाढत असल्याने तातडीने पाण्याचा निचरा करण्याबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच वसई विरार शहर
महानगरपालिका हद्दीतील पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महावितरण विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचाही आढावा आ. तरे यांनी घेतला. बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सखल परिसरात पाणी साचल्याने तसेच सूर्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


