आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होत असल्याने परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पंढरपूर नगरी स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष पथक पाठविण्यात आले होते.
नवी मुंबईच्या महापौर श्रीम. जाणाऱ्या विशेष पथकाच्या नवी सुजाता पाटील यांनी पंढरपूरला मुंबईतून पंढरपूर प्रस्थानाप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून या पथकास उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या होत्या.
या विशेष स्वच्छता पथकाने 21 आणि 22 जुलै 2026 रोजी 2 दिवस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून सेवाभावाचे दर्शन घडविले.
पथक प्रमुख स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील आणि नवनाथ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली 30 स्वच्छता दूतांनी 21 व 22 जुलै असे सलग 2 दिवस विठ्ठल मंदिर परीसर, मार्केट परीसर, चंद्रभागा नदीवरील उड्डाणपूल येथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत अथक स्वच्छताकार्य केले. त्यासोबतच चंद्रभागा नदीपात्राचीही साफसफाई केली, त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालय परिसराची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. या कामात सर्व स्वच्छतादूतांनी भक्तीभावाने सेवाभावी वृत्तीने उत्साहात सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचेच्या या विशेष स्वच्छता पथकाने पंढरपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त ठेवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले व सालाबादाप्रमाणे याही वर्षी वारी कालावधीतील स्वच्छतेची परंपरा कायम राखली.


