कोपरी पुलावर १२० चाकांचे ODC बंद

वाहतूक शाखेने टाळली मोठी कोंडी

मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलावर शुक्रवारी सकाळी १२० चाकांचे ओव्हर डायमेन्शनल कार्गो (ODC) वाहन गिअर बॉक्स निकामी झाल्याने बंद पडले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी वाहतूक शाखेने तातडीने वाहतुकीचे नियोजन केले. दोन हायड्रा आणि दोन क्रेनच्या सहाय्याने अवजड वाहन रस्त्याच्या कडेला हलविण्यात आले.

वाहतूक शाखेच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी वाहतूक कोंडी टळली आणि कार्यालयीन वेळेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.

Scroll to Top