नळ जोडणी व मलनिस्सारण वाहिनी खंडित
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अतिधोकादायक सी १ प्रवर्गातील इमारतींमध्ये पावसाळी कालावधीत कोणताही दुर्घटना घडू नये यादृष्टीने काळजी घेत या इमारतींमधील रहिवास थांबवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ अमोल पालवे व परिमंडळ २ चे उपायुक्त संजय शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आज नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सी १ प्रवर्गातील अतिधोकादायक इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथील रहिवास थांबावा याकरिता त्या इमारतींची नळ जोडणी व मलनिःसारण वाहिनी खंडित करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त शहर अभियंता मदन वाघचौडे तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेले अतिक्रमण विभागाचे अधिकारी -कर्मचारी त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


